गुरुपुष्यामृत योग २१ नोव्हेंबर 2024: शुभ मुहूर्ताचे महत्त्व आणि उपाय | श्री गुरुदेव दत्त

गुरुपुष्यामृत-योग-२१-नोव्हेंबरguru-pushya-amrut-yoga-november-21-2024-significance-upay-shri-gurudev-datt.
गुरुपुष्यामृत योग २१ नोव्हेंबर

✨चालू इंग्रजी वर्षातील शेवटचा गुरूपुष्य योग..

✨हा गुरुपुष्यामृत योग फक्त सकाळी सूर्योदय (स.६.३०) ते दुपारी ३.३६ पर्यंत आहे..

🔆गुरुपुष्यामृतयोग हे आपण दिनदर्शिके मध्ये नेहमीच बघतो.हा गुरुपुष्यामृत योग काय आहे..याबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेऊया…

🔅गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते.

🔅या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी विशिष्ट काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते. सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो.

Gurucharitra Adhyay 14 with lyrics | गुरुचरित्र अध्याय १४ अर्थ आणि महत्त्व, PDF Download Marathi

🔅या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात.

🔅जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतॊ.

🔅गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता.

🔅 विवाह बस्ता साठी हा मुहूर्त मानला जातो .एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस. ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.

🔅गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते. नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते..

|| श्री गुरुदेव दत्त ||🌸🔆

🔸आज गुरूवार २१ नोव्हेंबर रोजी विशेष गुरुपुष्याम्रुत योग सूर्योदय ते दुपारी ३.३६ पर्यंत आहे..

Swami Samarth Arogya Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “आरोग्य सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

Leave a Comment