Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

organic carbon ksa vadhvaycha ? सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल?

By Mahiti Garjechi Team

Published On:

Follow Us

organic carbon ksa vadhvaycha?

Organic Carbon – जमिन बोलतेय, ऐकतोयस का?

शेतकरी मित्रांनो,
एक प्रश्न स्वतःला विचारा…
दरवर्षी खत वाढवताय,
फवारणी वाढवताय,
पण उत्पादन तिथेच अडकलंय का?
पाणी दिलं तरी जमीन लगेच कोरडी होते,
थोडा पाऊस पडला तरी
शेतात चिखल होतो का?

👉 ही रोगाची लक्षणं नाहीत.
👉 ही जमिनीच्या दमण्याची लक्षणं आहेत.

समस्या खताची नाही… जमिनीची आहे

आपण झाडाला रोज खायला देतो,
पण जमिनीला कधी विचारलं का —
“तू ठीक आहेस का?”

जमीन जिवंत असते.
आणि त्या जीवंतपणाचं नाव आहे —
👉 सेंद्रिय कर्ब (Organic Carbon).

सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? (सोप्या भाषेत)

सेंद्रिय कर्ब म्हणजे
जमिनीत पडलेले पीक अवशेष,
मुळं, शेणखत, हिरवळ
यांचं सूक्ष्म जिवाणूंनी केलेलं रूपांतर.

यालाच विज्ञानात म्हणतात Humus.
हा कर्ब म्हणजे
जमिनीचा ATM आहे.
आज घातलेलं खत
उद्या झाडाला मिळायचं असेल,
तर मध्ये हा सेंद्रिय कर्ब हवाच.

कर्ब कमी झाला की काय होतं?

  • खत दिलं तरी झाडाला लागत नाही
  • पाणी दिलं तरी धरून राहत नाही
  • मुळं खोल जात नाहीत
  • झाड वरून हिरवं, आतून कमजोर राहतं

कारण काय?
जमिनीत अन्न धरून ठेवणारी शक्तीच उरलेली नसते.
थोडं विज्ञान जाणून घेऊया
सेंद्रिय कर्ब वाढला की
जमिनीत ह्युमिक आणि फुल्विक ऍसिड तयार होतात.

हे नैसर्गिक ऍसिड
जमिनीत अडकलेलं
फॉस्फरस, पोटॅश, झिंक
झाडासाठी उपलब्ध करून देतात.

तसंच कर्ब वाढला की
जमिनीची CEC वाढते —
म्हणजे खत साठवण्याची क्षमता.

कर्ब नाही = खताची गळती.

आजची खरी अडचण
आपल्या बहुतेक जमिनीत
सेंद्रिय कर्ब 0.3% पेक्षाही कमी आहे
म्हणजे काय?
👉 जमीन अजून उभी आहे, पण श्वास घेत नाहीये.
आपण जमिनीला
वर्षानुवर्षे
फक्त रसायन दिलं,
अन्न दिलंच नाही.
फक्त स्प्रेने शेती वाचत नाही
जोपर्यंत जमिनीचा कर्ब वाढत नाही,
तोपर्यंत

  • टॉनिक
  • बूस्टर
  • स्पेशल फॉर्म्युला
    हे सगळं तात्पुरतं आहे.
    खरी गुंतवणूक जमिनीत आहे.

उपाय – जमिनीला परत जिवंत करा

  • पीक अवशेष जाळू नका
  • शेणखत, कंपोस्ट वापरा
  • हिरवळीची खते घ्या
  • आच्छादन (Mulching) ठेवा
  • जमिनीत हवा आणि पाणी खेळतं ठेवा

हे केलं,
तर जमीन स्वतः तुमच्यासाठी काम करेल.
शेवटचं लक्षात ठेवा
सेंद्रिय कर्ब हा खर्च नाही तर तो विमा आहे भविष्याचा.
जमीन वाचली तरच शेती वाचेल.
ही माहिती शेतकऱ्याला विचार करायला लावणारी वाटली,
तर कमीत कमी 5 शेतकऱ्यांना शेअर करा आणि विसरून जाऊ नये म्हणून सेव करा.आणि अशीच जमिनीच्या आरोग्यावर आधारित खरी शेती विज्ञान जाणून घेण्यासाठी
👉 AGRICOSS.MAHESH ला फॉलो करा 🌱

Leave a Comment

I am Mahesh, author at Mahiti Garjechi. Coming from a farming family, I understand the real challenges farmers face every day. Through this blog, I share reliable information about government schemes, Krushi Yojana, herbicides, insecticides, and important agriculture updates. My mission is to make sure that farmers and readers get authentic, easy-to-understand, and timely information that helps them in decision-making.