श्री स्वामी समर्थ , सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे , आज आपण प्रिया ताईंचा खरा अनुभव पाहणार आहोत , जर तुम्हाला पण तुमचा अनुभव शेअर कराईचा असेल तर , खाली कमेन्ट मध्ये शेअर करू शकता किव्हा व्हाटसप्प वरती शेअर करा . धन्यवाद !
भक्ति प्रवासात काही अनुभव असे असतात, जे आपल्या मनाला नवी दिशा देतात आणि श्रद्धेला अधिक खोल अर्थ मिळवून देतात. ही गोष्ट प्रिया ताईंच्या अशाच एका अनुभवाची आहे. लहानपणी, फक्त आठवीत असताना, त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्या बालमनाला स्वामींच्या उपस्थितीचं महत्त्व समजलं नाही. तो एक साधा प्रसंग वाटला.
आज प्रिया ताई मोठ्या झाल्या आहेत, आणि त्या प्रसंगाचा अर्थ आता त्यांना कळतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि भक्तीचे खरे महत्व त्यांना जाणवले आहे. हा अनुभव त्यांना शिकवून गेला की, निःस्वार्थपणे केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. देव नेहमीच आपल्या आयुष्यात असतो, फक्त त्याचा अनुभव घ्यायला योग्य वेळ येते.
प्रिया ताईंचा अनुभव : श्री स्वामी समर्थ
🙏 सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार 👏👏
मी प्रिया निकम तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. मी 8वीला असताना माझ्या आत्यांनी मला देवासमोर रांगोळी काढायची सांगितली होती.व वरती श्री स्वामी समर्थ नाव असं लिहायचं सांगितले होते.व मी दररोज सकाळी देवासमोर रांगोळी काढायची व स्वामी समर्थ नाव लिहायची. मला सारखी स्वप्न पडायला लागली दररोज स्वप्नामध्ये अक्कलकोटचे जे वटवृक्ष मंदिर आहे.ते दिसायचे व स्वामी महाराज मंदिरामध्ये साक्षात बसलेली दिसायचे. असं दररोज स्वप्न पडत होते मला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी गेले होते. मी व माझे सर्व मावस बहीण भाऊ आले होते. आणि आम्ही शेतामध्ये गेलो. पूर्वी लपंडाव खेळायचे बघा आता नाही खेळत कोणी पूर्वी खेळायचे व राज्य माझ्यावर आला होता. मग माझ्या मावस बहिणीने माझे डोळे बांधले .व मला थोड बागांमध्ये पुढे नेऊन व ते सर्व लपण्यासाठी मोसंबीच्या बागा मध्ये गेले.व मी जसं दहा ,ते शंभर पर्यंत मोजले व डोळे उघडले तर बघते तर काय समोर स्वामी समर्थ महाराज साक्षात बसलेले होते.पन तेव्हा मी फारच घाबरून गेले होते.आता पश्चाताप होतो की तेव्हा दर्शन घेतले नाही.पन तेव्हा लहान होते मी मला काही कळलं नाही. आणि सांगणार कोणी नव्हतं की तुला स्वामी महाराजांनी साक्षात दर्शन दिले असं . मला एवढेच सांगायचे की,स्वामी समर्थ महाराज ते अशे ब्रम्हांडनायक आहे की थोडी जरी सेवा केली ना ते भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन हे देतातच .
म्हणून एवढेच सांगते की स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा.
🙏श्री स्वामी समर्थ🙏
2 thoughts on “Swami Samarth Real Experience Story| 8 वीतच स्वामींचे दर्शन, पण ओळखू शकले नाही! प्रिया ताईंच्या खरा अनुभव- श्री स्वामी समर्थ”