श्री दत्त तीर्थक्षेत्री जाण्याचा महिमा आणि फलप्राप्तीचे मार्ग
श्री स्वामी समर्थ ! , स्वामी भक्तानो ,श्री दत्त महाराजांची तीर्थक्षेत्रे म्हणजे आपल्याला समस्यांमधून मार्ग दाखवणारे, मनःशांती देणारे आणि जीवनात आनंदाचा झरा उलगडून देणारे पवित्र स्थळ आहेत. आपल्याला आपल्या आयुष्यातील चिंता, मानसिक ताण किंवा समस्यांचे समाधान हवे असल्यास, या पवित्र स्थळांना भेट देऊन भक्तीपूर्ण साधना आणि प्रार्थना केली पाहिजे . खाली आपण वीवध श्री दत्त तीर्थक्षेत्रे आणि त्यांचा विशेष महिमा व लाभ दिला आहे तो समजून घेणार आहोत .
1️⃣ संततीची इच्छा पूर्ण करण्यासाठी:
जर तुम्हाला संततीसंबंधी काही समस्या असतील, मूल होण्यासाठी प्रार्थना करायची असेल किंवा तुमच्या मुलासाठी आशीर्वाद हवा असेल, तर कारंजा (जन्मस्थान) येथे अवश्य जावे व दर्शन घ्यावे .
जन्मभूमीच्या पवित्र परिसरात शांत चित्ताने बसा. “तुमचा थोडासा अंश आमच्या घरात येऊ द्या,” या भावनेने प्रार्थना करा. तिथला आनंद लहरी तुमचं आयुष्य सुखद करील.
भगवान दत्त यांचा दूसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज
2️⃣ व्यवसायात भरभराटीसाठी:
तुमच्या उद्योग-व्यवसायाला यश मिळावे असे वाटत असेल, तर अमरापूर येथे जाऊन प्रार्थना करा. श्री दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्या व्यवसायाला उंचीवर नेईल.
swami samarth information in marathi|श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ संपूर्ण माहिती
3️⃣ मुलांना सद्बुद्धीसाठी:
तुमच्या मुलांना उत्तम विचार, सद्बुद्धी आणि चांगला मार्ग सापडावा, यासाठी औदुंबर या तीर्थक्षेत्री भेट द्या. तेथील पवित्र वातावरण तुमच्या इच्छांची पूर्तता करील.
श्री दत्त संस्थान,
औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली,
4️⃣ अहंकार दूर करण्यासाठी:
जर तुमच्या मनात अहंकाराचा उगम झाला असेल, किंवा तो दूर करायचा असेल, तर शिरोळ येथे भिक्षाटन करा किंवा कुमशी येथे साधना करा. नम्रतेने केलेली ही प्रार्थना तुमच्या मनातील अहंकार नष्ट करेल आणि तुम्हाला शांतता मिळवून देईल.
1 thought on “श्री दत्त तीर्थक्षेत्री जाण्याचे महत्त्व आणि समस्यांवर उपाय | फलप्राप्तीचे मार्ग”