शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक साधनांची साथ मिळावी यासाठी SCSP (Scheduled Caste Sub Plan) योजनेअंतर्गत एक महत्त्वाची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून SC/ST प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ब्रश कटर आणि ताडपत्री मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (NRCP), सोलापूर मार्फत करण्यात येणार आहे.
ST cast च्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करावीत
कोण अर्ज करू शकतात?
- फक्त SC/ST प्रवर्गातील शेतकरी
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar Card)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- 7/12 उतारा (गट नंबर व शेतीची माहिती असलेला)
(Submit Xerox copy Of all documents)
वाटप होणारी साधने
- इलेक्ट्रिक ब्रश कटर – शेतातील गवत व झुडपे स्वच्छ करण्यासाठी
- ताडपत्री (Tarpaulin) – शेतीमाल संरक्षण व पिकांची कापणी सोपी करण्यासाठी
वाटपाची तारीख
- तारीख निश्चित नाही
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची निवड केली जाईल
- First Come – First Serve Basis नुसार वाटप होणार आहे
अर्ज कसा करावा?
- इच्छुक शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे NRCP सोलापूर येथे सादर करावीत
- योग्य अर्जदारांची यादी तपासून निवडीनंतर साधनांचे वाटप करण्यात येईल
या योजनेमुळे SC/ST शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने मोफत उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.
1 thought on “SC/ST शेतकऱ्यांसाठी विशेष योजना : NRCP सोलापूरमार्फत ब्रश कटर व ताडपत्री वाटप”