Swami Samarth Sankat Mochan Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

॥ श्री स्वामी समर्थ ॥

श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेडे रोड, नांदुरशिंगोटे ता.सिन्नर जि. नाशिक.
संकट मोचन सेवा

संकट-मोचण-सेवा-sankat-mochan-seva-mahiti
“संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती

संकट मोचन सेवा करावी सोबत गणपतीची सेवा (मंगळवारची सेवा) करावी.

खालील सेवा शनिवारी किंवा मंगळवारी चालू करावी.

१) शनिवारी एक लिंबू घ्या त्या लिंबाला डाव्या हाताने आडवे पकडा नंतर त्यावर चार लवंगा टोचा (काडीने होल पाडू नये ) लवंगानी होल पाडा
२) आता ह्या लिंबा वर म्हणजेच लिंबू डाव्या हातात ठेवा किंवा वाटी मध्ये समोर ठेऊन सेवा करा.


मंदिरात जाण्यापुर्वी लिंबु वरती पुढील सेवा करावी.

“श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः “ह्या मंत्राचा ५ माळ जप करा

४) आता पुढील सामग्री तयार ठेवा
१) १०० ग्रॅम गूळ.
२) १०० ग्रॅम हरभरा दाळ.
३) २१ लवंगा लाल दोऱ्याने ओवुन १ माळ तयार करा.
४) १ पान्याचा नारळ.
५) थोडी कणीक घ्या त्यामधे थोडी हळद मिसळुन पानी घेउन त्याचा 1 गोळा तयार करा त्या गोळ्यापासुन 1 दिवा बनवा.

  • आता हनुमानाच्या मंदिरात जा गेल्यानंतर तो हळदेने तयार केलेला कणकेचा दिवा पेटवून द्या.
  • ती तयार केलेली २१ लवंगाची माळ हनुमानाच्या गळ्यामध्ये घालून द्या.
  • नंतर १०० ग्रॅम गूळ १०० ग्रॅम हरभऱ्याची डाळ वेगवेगळ्या कागदामधे हनुमंताला पायासमोर अर्पण करा, डाळ आणि गुळ फक्त एकदा सेवा सुरु करते वेळी द्यावी.
  • 4 लवंगा टोचलेला लिंबू घेऊन हनुमानाच्या पायाला लावा आणि आपली इच्छा व्यक्त करा, माझी मनोकामना पूर्ण करा अशी हनुंमंताला प्रार्थना करा.
  • नारळ फोडा व प्रसाद म्हणुन खाण्यासाठी घरी आणा. हनुमानाच्या पायाला लावलेले ते लिंबू आता घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवा
  • घरामध्ये (म्हनजे आग्नेय कोपऱ्यात मांडी घालून बसा १ वेळा कालभैरवाष्टक म्हणा सेम असेच वायव्य नैऋत्य ईशान्य राहलेल्या तीन्ही कोपर्यात बसुन प्रत्तेकी १ वेळा कालभैरवाष्टक म्हणा)
  • येथे वाचा : श्री कालभैरवाष्टक संपूर्ण – Kalabhairava Ashtakam Marathi
  • आता आजच्या दिवशी 3 माळ ‘’श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नम:’’ या मंत्राचा जप करा आणी ३ वेळा हनुमान चालीसा वाचा.

‘’श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नम:’

  • नंतर ते लिंबू देवघरामध्ये ठेवून द्या.
  • नंतर दररोज लगातार १५१ दिवस खालीलप्रमाणे त्या लिंबुवर सेवा करा .


दररोज आंघोळ झाल्यानंतर सकाळी ते लिंबू वर पुढिल सेवा करावी

१) आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य (प्रत्तेक कोपऱ्यात कापराची १ वडी) जाळा
व चारही कोपऱ्याला कालभैरवाष्टक म्हणावे. नंतर देवासमोर / एका जागी बसुन पुढिल सेवा करावी.
२) ३ माळ ” श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः” या मंत्राचा जप करा .
३) ३ वेळा हनुमान चालीसा वाचा.
४) ३ वेळा रामरक्षा वाचा.
५) ३ वेळा गणपती अथर्वशिर्ष वाचा.
६) ११ वेळा घोराअष्टक स्तोत्र वाचा. येथे वाचा :Ghorkashtodharan अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम् Stotra In Marathi घोरआष्टक स्तोत्र
७) गुरुचरित्रातील १४ वा अध्याय 1 वेळा वाचा.

7 thoughts on “Swami Samarth Sankat Mochan Sewa Marathi |श्री स्वामी समर्थ “संकट मोचन सेवा” कशी करावी संपूर्ण माहिती”

Leave a Comment