नमस्कार स्वामी भक्तानो ,||श्री स्वामी समर्थ ||आज आपण , दिवा का लावावा. आणि कधी लावावा. याच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण यावर चर्चा करणार आहोत .Why light a lamp near God? And when to plant. Be sure to read the scientific and scientific reason for this….
वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण
दिवसाला एकूण ८ प्रहर असतात
यात दिवसाला ४ व रात्रीचे ४ चे प्रहर असतात. यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यता त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असते. तो कसा
दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ४ ते ७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. सुर्य अस्ताची वेळ आणि सुर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते. जी सध्या ६.४५ ते ७.३० आहे. आणि हिच वेळ दिवा लावण्या साठी योग्य सांगीतली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे ७ च्या आत घरात
सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ
दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे.
दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे, जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. शरिरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. वातावरणात सुक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते. ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण कारण
बर्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते. अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला ‘कातरवेळ’ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’
तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायूमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायूमंडलात कार्यरत असणार्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय (भीती) निर्माण करतात. तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लावून ‘शुभं करोति’ व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभेवती संरक्षक-कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने १२ तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत रहातात. व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास साहाय्य होते.
असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता ह्या राखणदारा सोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात. व घरातील व्यक्तींना व घराला वाईट स्पंदनांपासुन संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातारवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळ दिवा लावला जातो.
संध्याकाळी 6.30 नंतर केव्हाही दिवा लावावा, दिवा लावल्यावर घरातील सुवासींनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता, ग्रामदेवता, लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन् दिवा यांना नमस्कार करावा !
नवीन युग व मोडत असलेली परंपरा !
हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळ नंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जस आई वडील मुलांची वट पाहतात की मुल कधी घरी येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते
पण आता दिवस बदललेले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार, पब, क्लब मधे बाहेर जाण्याचे. दिवा लावण तर दुर राहील बिल येत म्हणून घरातील लाईट सुध्धा बंद करून जातात लोक याचे परीणाम ते वेगळं सांगायला नकोच आपण पहातच आहोत
5 thoughts on “देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा. याच वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा….”